#PUNE CRIME : तसल्या रिल्स बनवणं भोवल ! तलवार आणि कोयता घेऊन बनवत होते रील, शिक्रापूर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात, आणि …

1075 0

पुणे : सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण मालामाल होत आहेत. काही जण खरंच चांगला कंटेंटही देत आहेत. पण काही जण उगाच रिल्स बनवताना हत्यार वापराने, अपशब्द यांचा उपयोग करतात. अशांनी आता सावध होणं गरजेचं आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल मीडियावर देखील बारीक नजर ठेवायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तिघा जणांनी हातात तलवार आणि कोयते घेऊन रिल्स बनवल्या होत्या. या तिघांना सुद्धा आता शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. पुण्यात काही दिवसांपासून अशा सातत्याने घटना घडत आहेत. आणि पोलीस अशा सोशल मीडिया युजर्सला ताब्यात घेऊन कारवाई देखील करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!