PUNE CRIME : व्यवसायिकाचे अपहरण, पाच लाखाची मागितली खंडणी, अल्पवयीन आरोपीसह एक साथीदार गजाआड

419 0

पुणे : केसनंद येथील अन्नाचा ढाबा येथे शनिवारी रात्री एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आले. शेवरलेट क्रूज कार रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने अपहरण करण्यात आलेल्या व्यवसायिकास बोलून घेण्यात आले होते. यातील एक आरोपी हा फिर्यादींच्या ओळखीतील व्यक्ती आहे. 

यांनी कार दुरुस्तीच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि कारमधून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर घरच्यांना पाच लाख रुपयांचे खंडणी मागण्यात आली. खंडणी मागितल्यानंतर तडजोडांती ही खंडणी दीड लाखापर्यंत येऊन पोहोचली.

हे दीड लाख रुपये आरोपींनी एका ठरलेल्या ठिकाणी सोडण्यास सांगितले आणि त्यानंतर फिर्यादी यांना  वाडेबोल्हाईच्या कमानीजवळ सोडले. तसेच पोलिसांना या प्रकरणी कोणतीही माहिती दिली तर मुलीला पळून नेऊ अशी धमकी देखील या आरोपींनी दिल्याचे समजते. पोलिसांनी या अपहरण आणि खंडणी प्रकरणातील तिघांना इंदापूर येथून ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!