पुणे : विश्रामबाग दत्तवाडी फरासखाना पोलीस स्टेशन ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर MPDA कायद्या अंतर्गत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
उमेश वसंत जंगम (वय वर्ष 25) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, या गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांसह विश्रामबाग, दत्तवाडी आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी रॉड अशा हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध , घरफोडी गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये त्याच्यासोबत सहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.