#PUNE : कसबा मतदार संघासाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित; रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

643 0

पुणे : कसबा पेठ मतदार संघात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता कसब्यातून हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाजपने आपले उमेदवार घोषित केले. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघासाठी टिळक कुटुंबातूनच सदस्याला उमेदवारी मिळावी अशी आशा टिळक कुटुंबाला असताना भाजपने मात्र हेमंत रासने यांना आपली उमेदवारी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

तर काँग्रेसच्या वतीने देखील आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसकडून आता रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे ही लढत आता चुरशीची होणार हे निश्चित आहे.

Share This News
error: Content is protected !!