Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

611 0

पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भजन-भक्तिगीत म्हणत पायी पंढरपूरला म्हणजेच वारीला जात असतात. पुणे पोलिसांनी सध्या लाखो वारकऱ्यांचा वारीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओत लाखो वारकरी तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे. मनमोहक निसर्गरम्य वातावरणात वारकऱ्यांची मोठी रांग सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पुणे शहर पोलीस यांच्या अधिकृत @PuneCityPolice या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या व्हिडिओला “पाऊले चालती पंढरीची वाट…” श्री क्षेत्र पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले वेगाने मार्गक्रमण करीत आहेत. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वैष्णवांचा मेळा एक-एक टप्पा पार करीत भक्तिनामात तल्लीन झाला आहे.” असे कॅप्शन दिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!