पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

328 0

पुणे : भाजपाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं गुरुवारी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुक्ता टिळक यांचे अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी जमा झाली आहे.

भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेत केसरी वाडा येथील राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशामभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!