छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी 13 डिसेंबर रोजी पुणे बंद

294 0

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मिय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत पुणे बंदचे आयोजन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री वाचाळवीराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करून इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा दाखला देऊन बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे मूग गिळून बसले असून या बाबत त्यांनी कोणतीही नापसंती व्यक्त केली नाही आणि कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही तसेच कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत केलेली नाही हा देखील एक प्रकारे या राष्ट्रपुरुषांचा अपमानच आहे.

पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी व महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी आहे. पुणेकर म्हणून या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या वाचाळ वीरांना योग्य तो संदेश देण्यासाठी सर्वधर्मिय शिवप्रेमी पुणेकर म्हणून मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी पुणे बंदचे आवाहन आम्ही करीत आहोत.

या दिवशी सकाळी १०.०० वा., डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पुढे खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – लक्ष्मी रोडने बेलबाग चौक डाव्या हाताने लाल महाल येथे सभेने समारोप होणार आहे.

या पुणे शहर बंदमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम संघटना, मागासवर्गीय संघटना, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, गणेश मंडळ, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, मराठा संघटना, मार्केटयार्ड मधील सर्व संघटना, रिक्षा संघटना, तालिम संघ, माथाडी कामगार संघ, वकील संघटना, क्रीडा संघटना, बँक असोसिएशन, कामगार युनियन, राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, एम. आय. एम., जनता दल, वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहिर केला आहे.

१३ डिसेंबर २०२२ ‘पुणे बंद’ ला पाठिंबा देणाऱ्या संघटना व संस्थाची नावे

१) मा. छत्रपती उदनराजे भोसले

२) माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

३) पुणे शहर व्यापारी संघटना

४) श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड काडते असोसिएशन, पुणे

५) मुलनिवासी मुस्लिम मंच

६) राष्ट्रसेवा समुह महाराष्ट्र

७) अखिल भारतीय

बहुजनसेना

८) स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

९) छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती

१०) पदवीधर विद्यार्थी संघ

११) श्रीमंती घोरपडे सरकार प्रतिष्ठान

१२) स्वराज्य भूमी प्रतिष्ठान

१३) शिवनेरी रिक्षा संघटना

१४) रिपब्लीकन युवा मोर्चा महाराष्ट्र

१५) युवक क्रांती दल

१६) शिवसंकल्प संस्था

१७) जातीय लोकाधिकार संघटना महाराष्ट्र

१८) पुणे शहर जिल्हा मातंग समाज

१९) लहुजी समता परिषद

२०) अद्वैत क्रीडा संघ

२१) रिजनल ख्रिश्चन सोसायटी

२२) मराठा टायगर फोर्स

२३) राजश्री शाहू महाराज सोशल फाऊंडेशन

२४) मराठा सेवक समिती

सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!