पुणे : …आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता संतापले … VIDEO

592 0

पुणे : पुण्याच्या गणपती विसर्जन सोहळ्यास यावर्षी चांगलाच विलंब झाला आहे. मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन देखील शुक्रवारी रात्री उशिरा झाले . तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन होण्यासाठी शनिवारची दुपार उजाडली . पोलीस प्रशासन या विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान ढोल ताशा पथकातील मोठे अंतर यामुळे अधिक विलंब लागला असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले . दरम्यान शुक्रवारी रात्री बारानंतर पोलीस आयुक्तांचा देखील पारा चढल्याचं पाहायला मिळालं . त्यास कारण देखील तसेच असल्याचे समजते .

व्हीडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार , रात्री बारानंतर डीजेला बंदी आहे. भर कुमठेकर रस्त्यावर एक गणेश मंडळ दीड तास एकाच जागी होते. पोलिसांनी त्यांना पुढे सरकण्याचे सांगितले असून देखील मंडळाच्या अध्यक्षांनी महापालिका स्वागत मंडपात जाऊन थेट स्पीकर वरून आणखी दोन गाणी वाजवा असे डीजेला सांगितले. यावरूनच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता प्रचंड संतापले. ते थेट मनपा स्वागत मंडपात येऊन कोण गाणी लावण्यास सांगत आहे असा संताप व्यक्त केला. परंतु तोपर्यंत फर्माईश करणारा व्यासपीठावरून गायब झाला होता.

Share This News
error: Content is protected !!