#PUNE : कसब्यात मतदानासाठी दबाव आणल्याचा आरोप ; उमेदवाराकडून पैसे वाटप ? नागरिक उतरले रस्स्त्यावर

343 0

पुणे : आज सकाळपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. दरम्यान शनिवारी रात्री कसबा पेठेत नागरिक मीठगंज पोलीस चौकी समोर उतरले होते. उमेदवारांकडून पैसे दिले जात असून दबाव आणून मारहाण केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पैसे वाटप आणि दबाव याला विरोध करत काल रात्री महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. कसबा पेठ पोट निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप काल दंगेकर यांनी केला होता. शनिवारी रात्रीही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सांगत लोहिया नगर गंज पेठ भागातील महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. नागरिकांनी पोलिसांकडे या बाबत कारवाईची मागणी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!