महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : INS विक्रांतचे आज जलावतरण ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ध्वजाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

395 0

केरळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत या महाकाय जहाजाचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी हा सोहळा अभिमानास्पद ठरला , कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या ध्वजाचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आला आहे. आय एन एस विक्रांत या जहाजाचे केरळच्या समुद्र तटावर आज जलावतरण होत आहे . महाकाय विक्रांत आज नेव्हीमध्ये दाखल झाले.

See the source image

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की , ” छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सामर्थ्याच्या जोरावर शत्रूंची झोप उडवणारी नौसेना उभारली होती. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा , भारतीयांनी तयार केलेले जहाज आणि त्याद्वारे होणारा व्यापार पाहून इंग्रज देखील बिथरले होते. त्यामुळेच त्यांनी भारताचं सागरी सामर्थ्य तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे करून भारतीय जहाज आणि व्यापार यांवर कठोर प्रतिबंध लादले होते . हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करण्यात आला असून , २ सप्टेंबर 2022 च्या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलण्याच एक काम झालं आहे .”

“आज भारताचे गुलामीचे एक निशान …, गुलामीच एक ओझं आपल्या छातीवरून उतरवल आहे. आज भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत नेव्हीचा ध्वज हा गुलामीची ओळख होता. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत नवा ध्वज तयार करण्यात आला आहे. हा ध्वज सागर आणि आकाशात डौलाने फडकेल असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ”

 

Share This News
error: Content is protected !!