JITENDRA AWHAD : “शासनाचा निषेध करीत मी माझा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करीत आहे…!”

238 0

मुंबई : तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या मध्ये हर हर महादेव या चित्रपटाच्या प्रदर्शना वेळी शो बंद पाडणे आणि प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना नोटीस देण्याच्या कारणाने बोलावून अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्तीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांनी ट्विटर द्वारे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामापत्र विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारे मागील तीन दिवसात माझ्यावर दोन खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मी शासनाचा निषेध करीत मी माझ्या राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करीत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!