Gold Price Hike : दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! सोन्याने गाठला आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

1370 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या (Gold Price Hike) दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. स्वातंत्र्य काळानंतर सोन्याने आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर गाठला आहे. सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रती तोळा झाले असून 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ झाली आहे.इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सुवर्ण बाजारावर झाला असून आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा बसणार हे मात्र नक्की.

गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी वाढ झालीय. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा अंतरराष्ट्रीय बाजारांवर झाला असून यामुळे सोन्याचे भावही वाढले आहेत. त्यातच स्थायी गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून आगामी काळात सोन्याचे दर हे 70 हजार रूपये प्रतितोळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सोन्याचा भाव जीएसटी सहित 63 हजार रुपये प्रती तोळा तर चांदीचे भाव 76 हजार रुपये प्रतीकिलो आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेण्याची प्रथा असते, पण पुन्हा सोन्याचे दर वाढल्याने आमचे आर्थिक गणित बिघडले असून कमी सोनं खरेदी करावे लागत असल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!