‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

2781 0

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं फळ त्यांना देईल. 18 वर्षानंतर शनिवारी रात्री घडलेली घटना त्याच शापामुळे घडली की काय, असं म्हटलं जातंय.

अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांचीही शनिवारी तिघाजणांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. त्यावेळी माध्यमांचा गराडा त्यांच्याभोवती पडला. माध्यमांसमोर बोलत असताना पत्रकाराच्या वेशात आलेल्या सशस्त्र हल्लेखोलांनी अतीक आणि अशरफ यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर दिवंगत राजू पालची पत्नी पूजा पाल हिने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘जैसा करता है वैसाही भरता है.. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते..माणसाच्या कर्माचं फळ इथेच भोगून जावं लागतं…’

पूजा पालची शापवाणी भोवली…

प्रयागराज पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अतिकने त्याचा भाऊ अशरफला उतरवलं होतं. अशरफसमोर बसपाचे राजू पाल यांचं आव्हान होतं. राजू पाल यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर लगेच त्यांचं लग्नही झालं. राजू पाल याच्या विजयाचा आनंद अतिक अहमद आणि अशरफ यांना सहन होत नव्हता. त्यांनी राजू पालला खतम करण्याचे ठरवले. 25 जानेवारी 2005 रोजी धूमनगंज या ठिकाणी राजू पालला गुंडांनी घेरले आणि तिथेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आला. नऊ दिवसांपूर्वीच राजू पाल याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी पूजा पाल यांच्या हातावरची मेंदी अजून सुकलेली नसतानाच पतीच्या खुलेआम झालेल्या हत्येने ती कोलमडून गेली.

त्याच दिवशी पूजा पालने अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता. अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं फळ त्यांना देईल. त्याच शापवाणीमुळे 18 वर्षानंतर शनिवारी रात्री अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्यात आली असे बोलले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide