पुण्यात राजकीय उलथापालथ : मनसेचे निलेश माझीरे यांच्यासह 400 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र !

761 0

पुणे : पुण्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अर्थात मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांना पदावरून हटवल्यानंतर या हालचाली होणार यात शंका नव्हती. निलेश माझीरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केल्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने देखील मनसेला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यानंतर आता मनसेचे नेते वसंत मोरे हे देखील पक्षावर नाराज आहेत.

त्यात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील तात्या कधी येताय ? मी वाट पाहतोय…! असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट ऑफरचं दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्या कार्याची ही पावती आहे. परंतु मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही. असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता निलेश माझिरे यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयानंतर पक्षावर अनेक दिवसांपासून नाराज असलेले वसंत मोरे नक्की काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

Share This News
error: Content is protected !!