CRIME NEWS : पुण्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची कारवाई

380 0

पुणे : काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. आजपर्यंत 76 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले असून , आज विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कुख्यात गुन्हेगार अक्षय नगरे वय वर्षे 23 या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह विश्रांतवाडी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता ,लोखंडी तलवार ,पालघन अशा जीव घेण्या हत्यारांसह खुणाचा प्रयत्न दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे या प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत .

या सराईत गुन्हेगाराच्या दहशतीमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यास आपल्या जीवितास आणि मालमत्तेच नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक देखील उघडपणे तक्रार करत नव्हते. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या आरोपी विरुद्ध १ वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!