पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड

609 0

पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या केलेल्या पत्रात पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या, सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 426 प्राथमिक आणि 90 माध्यमिक अशा एकूण 516 शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने पीएमश्री योजनेला 7 सप्टेंबर 2022 रोजी मान्यता दिली. यात नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी 26 तर सोलापूर जिल्ह्यातील 23 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत येत्या वर्षात 1 हजार 351 आयसीटी लॅब, 2 हजार 40 डिजिटल लायब्ररी, 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम्स, 105 स्टेम लॅब, 533 टिकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 97 हजार 249 टॅब देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करणं, तसच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडवण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत देशात एकूण 14 हजार 500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना 5 वर्षांसाठी राबवली जाणार असून, या अंतर्गत निवड झालेल्या शाळा आदर्श शाळांमध्ये रूपांतरित होणार आहेत.

या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी 60% निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून, राज्य सरकारचा हिस्सा 40% असणार आहे. यासाठी राज्य सरकार प्रत्येक शाळेला 5 वर्षांसाठी 1 कोटी 88 लाखांचा निधी उपलब्ध करुन देणार आहेत. पीएमश्री योजनेतून शाळांचा विकास केला जाणार आहे. यामुळे शाळांमध्ये काय बदल होणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide