PMPML च्या ई-बस डेपोचं उद्या उद्घाटन ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

338 0

पुणे : PMPML च्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतील. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे.

यावेळी 90 ई-बसेसचे लोकार्पण करण्यात येईल. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे हे ही उपस्थित असणार आहेत. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गाच नियोजन करण्यात आलं आहे. त्या मार्गावर या बसेस धावतील. त्यामुळे चाकरमान्यांना आणि सर्वसामान्य पुणेकरांना सुविधा मिळणार आहे. तसेच ई-बसेसमुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल.केंद्र सरकारने पुण्यासाठी 150 ई बसेसची भेट दिली आहे. त्यापैकी 90 बसेसचं उद्या लोकार्पण सोहळा होत आहे. आता या सोहळ्यात राजकीय फटकेबाजी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!