मंगळवारी सायंकाळी बजरंगबलीची करा अशी पूजा; सर्व संकटांचा होईल नाश

291 0

आज मंगळवारच्या निमित्ताने श्री हनुमानाची केलेली उपासना नक्कीच फलदायी ठरते, असा अनेकांना अनुभव आलेला आहे. आजच्या सायंकाळी बजरंगबलीची केलेली उपासना आयुष्यातील अनेक लहान मोठ्या संकटांना दूर ठेवण्यासाठी मदत तर करेनच पण इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतील.

जर घराच्या बाहेर जाऊन बजरंगबलीचे दर्शन मंदिरात घेऊ शकत असाल तर बाहेर पडताना वाटीभर डाळ आणि गूळ घेऊन अवश्य जावे. आज मंदिरात बजरंगबली समोर डाळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा किंवा घरातील देवांसमोर जरी डाळ आणि गुळाचा नैवेद्य ठेवला तरी चालेल. यामुळे घरातील अन्य धान्याचा तुटवडा कधीही जाणवणार नाही.  घरामध्ये सातत्याने अन्नाची नासाडी होत असेल तर हा उपाय अवश्य करून पहावा.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीच्या ठिकाणी त्रास जाणवत असेल तर आज मंदिरामध्ये बजरंगबली समोर पानाचा विडा अर्पण करा आणि जमल्यास सुंदर कांडचे पठण करावे. यामुळे अवश्य बजरंग बलीची कृपा होऊन मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.

सायंकाळी देवाचा दिवा लावल्यानंतर घरामध्येच राम रक्षास्तोत्र, हनुमान चालीसा,वडवानल स्तोत्र अवश्य पठण करा. त्यामुळे घरातील प्रत्येकाचे वाईट प्रवृत्तींपासून रक्षण होईल.

जर मनामध्ये कोणत्याही प्रकारची सातत्याने भीती वाटते. मन अस्वस्थ होत राहत असेल, तर आजच्या दिवशी मंदिरात जाऊन किंवा घरातील हनुमानाच्या प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामांच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा.

Share This News
error: Content is protected !!