पत्राचाळ घोटाळा प्रकरण : ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये शरद पवारांचेही नाव ? वाचा सविस्तर

275 0

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत वाढ झाली आहे. दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तात्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं म्हटलं जात आहे.

अधिक वाचा : VIDEO : ‘परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच’…! – सुषमा अंधारे

अर्थातच तात्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावाचा या आरोप पत्रामध्ये उल्लेख आहे. 2006 ते ७ या वर्षभरामध्ये पत्राचाळ प्रकरणी बैठका झाल्या. यामध्ये म्हाडाचे अधिकारी तात्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. असं ईडीने आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. तर पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे प्रिंट मॅन म्हणून काम करत होते. तर संजय राऊत हेच या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार होते असे देखील या आरोप पत्रात म्हटलं आहे.

अधिक वाचा : कर चुकवेगिरीला बसणार आळा ; निवडणूक आयोगाची भारत सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी ; वाचा सविस्तर

Share This News
error: Content is protected !!