पठाणचा बिकनी वाद : सेन्सर बोर्डाने सांगितले ‘हे’ बदल; दीपिकाच्या बिकनीचा रंग बदलणार का ?

843 0

मुंबई : चार वर्षानंतर कमबॅक करताना शाहरुख खान आपल्या पठाण चित्रपटांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहू नये याची चांगलीच काळजी घेत आहे. परंतु या चित्रपटातील दीपिकाचा अत्यंत बोल्ड अवतार आणि त्यात भगव्या रंगाची बिकनी परिधान केल्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली आहे. यावर आता सेन्सर बोर्डाने चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. यामध्ये बेशरम रंग गाण्याचाही समावेश असल्याचे समजते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे बदल केलेला व्हर्जन समितीकडे सादर करण्याच्या देखील सूचना करण्यात आलया आहेत.

येत्या 25 जानेवारीला पठाण चित्रपट प्रदर्शित होणार असून, आता दीपिकाच्या भगव्या बिकनी ऐवजी दुसरा रंग दिसतो का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनी वरून प्रचंड वादंग निर्माण झाला, त्यात दीपिका ने बॉलीवूड मधील आतापर्यंतची सर्वात बोल्ड दृश्य दिली आहेत. त्यामुळे सनातन धर्माचा अपमान केला असा आरोप विविध हिंदू संघटनांकडून करण्यात येतो आहे.

See the source image

एकीकडे तिच्या या बोल्ड अवताराला नापसंत करणारे जेवढे लोक आहेत, तेवढेच अनेकांनी या गाण्याला पसंती देखील दर्शवली आहे. हे मात्र तेवढेच सत्य आहे.

Share This News
error: Content is protected !!