पंढरपुरात माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास (व्हिडिओ)

162 0

पंढरपूर- आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली असून पंढरपुरात जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.

देवाचे मुख दर्शन सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. माघी वारीला चंद्रभागा स्नानाला महत्व आहे. त्यादृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच एकादशी निमित्त पुण्यातील भाविक सचिन अण्णा चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी फुलांची आरास केली. झेंडू, शेवंती, जरबेरा आदी १ टन फुलांची आरास करण्यात आली. या फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसून आले. एकादशी निमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान ,नगरप्रदक्षिणा करून देवाचे दर्शन घेतले. शहरातील धर्मशाळा ,मठ , मंदिर परिसर येथे भाविकांची गर्दी टाळ मृदूंग व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्यविषयक सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, फराळ तसेच आरोग्य सेवा मोफत पुरविल्या आहेत. त्याचबरोबर दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक झाली.

Share This News

Related Post

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजांमध्ये 8 दिवसांची वाढ

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार. पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Posted by - February 18, 2024 0
जालना : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीत…

गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईत

Posted by - June 10, 2022 0
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी…

#Travel Diary : मानसी गंगा कुंड या पवित्र सरोवराचा संबंध श्रीकृष्ण-राधाराणीशी आहे, स्नान केल्याने मिळते प्रत्येक पापातुन मुक्ती

Posted by - March 9, 2023 0
आपल्या देशात गंगेला नदी नव्हे तर गंगा मैया म्हणतात आणि तिचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. पूजा-विधीच्या आधी जागा पवित्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *