RAIN ALERT : पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा (VIDEO)

220 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

आज सकाळपासून मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत 5 फुट 7 इंचाने वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!