#GOUTAMI PATIL : साताऱ्यात गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; पुन्हा काय घडलं ? वाचा सविस्तर

1351 0

सातारा : काही दिवसांपासून गौतमी पाटील हि नृत्यांगणा चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या सौंदर्याने आणि अदानी तिने तरुणांना घायाळ तर केलेच होते. पण सोशल मीडियावर जेव्हा तिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्या व्हिडिओमध्ये तिनं नृत्य करत असतानाच अश्लील हावभाव केल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.

त्यानंतर तिच्यावर प्रचंड टीकेची जोड उठली आहे. खरंतर त्यानंतर गौतमीन माफी देखील मागितली. पण महाराष्ट्राच्या लोककलेला अशा पद्धतीने सादर करणे हे कलावंतांना रुचलं नाही.

दरम्यान अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करून तक्रार दाखल केली होती. त्याच बरोबर मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. माफी मागितल्यानंतर काही दिवस तिने कोणतेही वाईट कृत्य केले नाही पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची हुल्लडबाजी सातत्याने पाहायला मिळते आहे. म्हणूनच पुन्हा एकदा तक्रार दाखल करण्यात आली असून सातारा कोर्टानं गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!