आशावादी बातमी : छत्रपती शिवरायांची ‘जगदंबा तलवार’ महाराष्ट्रात आणणार ? मुनगंटीवार म्हणाले…

345 0

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांची प्रत्येक आठवण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगणारी आणखीन एक वस्तू आहे जी सध्या ब्रिटनमध्ये आहे. अर्थात महाराजांची ‘जगदंबा तलवार’ ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 2024 पर्यंत जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे की, शिवराज्याभिषेकाला साधारण 2024 मध्ये साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागाच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम आखत आहोत. ब्रिटनने तलवार दिली तर आम्हाला आनंद आहे.

एकोणिसाव्या दशकापासून महाराजांची भवानी तलवार ही परत मागावी अशी मागणी होते आहे. 1875 मध्ये ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीसाठी आला होता. त्यावेळी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्याकडून जबरदस्तीनेच ही तलवार भेट म्हणून तो घेऊन गेला. त्यामुळे सध्या ऋषि सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून तलवार पुन्हा भारतात आणि महाराष्ट्रात आली तर आपलं वैभवचं परत येईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!