#ONLINE RUMMY : ऑनलाइन रमीची जाहिरात करणारे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील हे प्रसिद्ध कलाकार गोत्यात ? गुन्हा दाखल करण्याची मागणी

973 0

सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन रमीची जोरदार जाहिरात सुरू आहे. विशेष म्हणजे ही जाहिरात सर्वसामान्य कलाकार करत नसून हिंदी चित्रपट सृष्टीतील आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार करत आहेत. यामध्ये हिंदीतील रितिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुराद, अनुप सोनी, मनोज वाजपेयी, अली अजगर, शिशिर शर्मा यांच्यासह मराठीतील अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामत, संतोष जुवेकर, गौरी नलावडे आणि अमृता खानविलकर या कलाकारांचा समावेश आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागानं आक्षेप घेतला असून ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे पत्रक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. याप्रकरणी चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाइन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ही मागणी बाबासाहेब पाटील यांनी एका पत्राद्वारे केली असून यानंतर आता या कलाकारांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!