अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासून गर्दी, कसा करावा उपवास, पुजाविधी, गुळ आणि तिळाच्या लाडूचे विशेष महत्व

1086 0

पुणे : वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. आज पहाटेपासूनच भाविकांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून पहाटे चार ते सहा या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा बापाच्या चरणी सादर केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तनवी अभ्यंकर यांनी गायन केलं. तर केदार परांजपे,निलेश देशपांडे,अपूर्व द्रविड,आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ दिली आहे. रवींद्र खरे यांनी निवेदन केलं.

संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणीही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.

श्रीगणेशाला आज पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर धूप दीप लावून दुर्वा आणि लाल फुल वाहावे. आज गुळ आणि तिळाच्या लाडूचे विशेष महत्व असते.

आज विशेष करून गूळ आणि तीळाचा लाडू न्येवेद्य म्हणून ठेवावा. गूळ आणि तीळाचा लाडू बनवण्यासाठी पांढरे तीळ हलके भाजून घ्यावेत. त्यानंतर मिक्सरला एकदाच फिरवून घ्यावेत. फार बारीक करू नये, यामध्ये एक मोठी वाटी तिळासाठी अर्धी वाटी गूळ घालावा. हे मिश्रण एकत्र करून तूप घालून लाडू सारखे लहान लहान वळून घ्यावेत. आज श्री गणेशाला ७, 11, 21 किंवा आपल्या इच्छेप्रमाणे तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!