गणपती विसर्जनाच्या सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावेत – फत्तेचंद रांका

290 0

पुणे : गणेश विसर्जनासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झाल आहे. श्री गणेशाचा विसर्जन सोहळा देखील भक्तिमय वातावरणात आणि कायदा सुव्यवस्थेला गालबोट न लागता पार पडावा यासाठी पुणे पोलीस, जिल्हा प्रशासन ,अग्निशमन दल या सर्व यंत्रणा सज्ज असतानाच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी देखील सर्व व्यापारी आणि विशिष्ट भागातील सोसायटींना सायंकाळ नंतर आपल्या सोसायटी बाहेरील आणि दुकानात बाहेरील दिवे चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जेणेकरून गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हातभार लागेल दिवे चालू ठेवल्यामुळे चेन स्नॅचिंग , पाकीट मारी इत्यादी गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांना एक प्रकारे मदत होईल यासाठी हे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!