जन्मदात्या बापावरच केले भर दिवाळीच्या दिवशी कुऱ्हाडीने वार; आरोपी मुलाचा शोध सुरु

272 0

गोंदिया : भाऊबीजेच्या दिवशी संपूर्ण देशभरात सणाचा उत्साह होता. पण गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील मोकासीटोला इथं घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलानेच बापावर कुऱ्हाडीने वर केले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे. मोतिराम टांगसू कुंभरे, वय 60 असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

घरात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावरून संतापाच्या भारत मुले कुऱ्हाडीने वार घातले. गोंदिया जिल्ह्यतील डुग्गीपार पोलीस ठाण्यात या हत्याप्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केलाय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!