Breaking News

थुंकल्यावर घाण अंगावर उडाली म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठाची जबर मारहाण करून हत्या; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

582 0

डोंबिवली : डोंबिवलीतील चिचोंड्याचा पाडा या परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय पटवा वय वर्षे 52 हे डोंबिवली पश्चिम येथील नवापाडा परिसरात राहत होते. शनिवारी दुपारी कामानिमित्त चिचोंड्याचा पाडा परिसरातून जात असताना 19 वर्षीय कैफ खान हा रस्त्याने जात असताना थुंकला याची घाण पटवा यांच्या अंगावर उडाली.

त्यामुळे पटवा आणि कैफ खान या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये सुरू झाले. या घटनेमध्ये पटवा यांना जबर मारहाण झाली. लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याने ते जमिनीवर कोसळले. या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी जखमी अवस्थेतील पटवा यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यापूर्वीच डोक्याला जबर मारहाण लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आरोपी कैफ खान याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!