Breaking News

भोई प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी “रंगबरसे” रंग महोत्सवाचे आयोजन

456 0

भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी धुलीवंदनच्या दिवशी “रंगबरसे” हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. यामध्ये अनाथ एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारे मुले, रस्त्यावर फुगे विकणारी मुले, डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुले, मतिमंद मुले, अंध आणि अपंग मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, देवदासी भगिनींची मुले एकत्र येऊन रंग खेळतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी व त्यांच्याबरोबर रंग खेळण्यासाठी सातत्याने गेली २७ बर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टच्या वतीने यावर्षी मुलांसाठी खिचडी व शिरा उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ८ ते ९ पर्यंत मुलांना खिचडी व शिऱ्याचा नाष्टा देण्यात आला.

पोलीस बँड द्वारे मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांना जादूचे प्रयोग दाखवण्यात आले. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर व श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त श्री प्रताप भोसले यांच्या हस्ते पाण्याच्या टँकरचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डाँ. मिलींद भोई यांच्या तर्फे ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेंद्र वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. सर्व निष्पाप मुलं रंग खेळत आनंदाने नाचू लागली तेव्हा या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा मनापासून आनंद झाला.

Share This News
error: Content is protected !!