Offensive Video

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

1164 0

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ (Offensive Video) सध्या व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओवरून (Offensive Video) किरीट सोमय्यांवर विरोधकांकडून टीकेची जोड उठवण्यात येत आहे.असाच काही वर्षांपूर्वी भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यामुळे या नेत्याचे संपूर्ण राजकीय करिअर बरबाद झाले होते. हा नेता कोण आहे चला पाहुयात…

संजय जोशी असं या नेत्याचं नाव आहे. संजय जोशी हे मुळचे नागपूरचे मेकॅनिकल इंजीनियर. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मनावर झालेले. इंजिनियरिंग कॉलेजची चांगली चालणारी नोकरी सोडून संघाच्या कामात झोकून दिल. लग्न केलं नाही, पूर्णवेळ प्रचारक बनले. यानंतर त्यांचे कार्य बघून त्यांच्यावर गुजरात राज्याची जबाबदारी देण्यात आली. संजय जोशी गुजरात मध्ये गावोगाव फिरून संघाची पाळमूळ घट्ट करू लागले. लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत होता. यातच त्यांना काही साथीदार भेटले यात एक नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी.

संजय जोशी आणि नरेंद्र मोदी दोघेही घनिष्ठ मित्र मात्र काम करण्याची दोघांचीही स्टाईल मात्र वेगळी होती. नरेंद्र मोदी सुरवातीपासून कॉम्प्युटर सारख्या आधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करून स्ट्रटेजी बनवण्यासाठी ओळखले जायचे. तर संजय जोशी हे आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी प्रसिद्ध होते. संघ रचनेत काम करता करता हळूहळू संजय जोशी हे भाजपात सक्रिय झाले. यानंतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत संजय जोशी आपलं नेतृत्व सिद्ध करत होते मात्र याच दरम्यान संजय जोशी यांचा कथित व्हिडिओ असणारी सीडी प्रसिद्ध झाली भारतीय जनता पार्टीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच सेलिब्रेशन चालू होतं आणि संघाचे लाडके नेते संजय जोशी यांचे नाजूक स्थितीतील अवस्थेची सीडी वाटण्यात येत होती. हा एका स्टिंग ऑपरेशनचा भाग आहे असं सांगण्यात येत होतं. यामुळे अख्ख्या भाजपमध्ये खळबळ उडाली. यामुळे संजय जोशींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आज संजय जोशी हे नावसुद्धा देशाच्या राजकारणाच्या चर्चेत येत नाही. ते दिल्लीत एका छोट्या घरात राहतात. एखाद्या कथित व्हिडिओ मुळे (Offensive Video) एखाद्या राजकीय नेत्याचं करियर कसं संपू शकत याचं उदाहरण म्हणजे संजय जोशी.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!