Deputy CM Devendra Fadnavis : “आता विस्तार झाला…सरकारही मजबूत …काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही !”

290 0

पुणे : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर सरकार पडेल असे काही लोक म्हणत होते.आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही.असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आलेले असताना फडणवीस यांनी कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याच्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,महिला मंत्री नाही हा आरोप लवकरच दूर होईल.



महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्री मंडळात मिळेल. आधीच्या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्यावेळी त्यांच्याकडे पण महिला मंत्री नव्हत्या. त्यामुळे त्यांना हे बोलायचा काही अधिकार नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्या पक्षाचे दोन मंत्री आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील अशा पक्षाने अशा प्रकारचे यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावं आणि त्यानंतर ट्विट करावे. असा टोला आहे त्यांनी विद्या चव्हाण यांना यांना लगावला.संजय राठोड यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.असं सांगत फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

Share This News
error: Content is protected !!