Unknown नंबर नाही तर कॉल करणाऱ्याचं नाव दिसणार मोबाईल स्क्रीनवर; Spam Calls पासून होणार सुटका

386 0

Spam Calls च्या त्रासापासून लवकरच मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. Spam Calls रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नवीन फीचर नेमकं काय आहे जाणून घेऊया.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे नवीन फिचर कॉलर आयडेंटिशी निगडीत आहे. रिपोर्टनुसार, लवकरच तुम्हाला येणाऱ्या कॉलसोबतच कोणत्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केलाय त्याचं नावही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव युजरच्या केवायसीनुसार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिम असेल त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला दिसेल. हा नियम लागू होताच, वापरकर्त्यांना त्या कॉलरचे नाव देखील दिसेल, ज्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसेल. दूरसंचार विभाग पुढील तीन आठवड्यात हे फीचर लॉन्च करू शकते.

सध्या अशा फीचर्ससाठी यूजर्सला Truecaller सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची गरज आहे. पण या अ‍ॅप्सचा सर्वात मोठा मायनस पॉइंट म्हणजे त्यांचा डेटाबेस.

Truecaller सारख्या अ‍ॅप्सचा सर्व डेटा क्राउडसोर्स केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर १००% विश्वास ठेवता येत नाही. तुम्हाला KYC आधारित प्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवता येईल. अनेकांच्या मनात असाही प्रश्न येतो की, ही सेवा सुरू झाल्यानंतर Truecaller सारखे अ‍ॅप्स संपतील. ट्रायच्या या आगामी सेवेची चर्चा सुरू झाली तेव्हा Truecaller ने या सेवेशी स्पर्धा करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितले होते.

आता हा ही प्रश्न उपस्थित होतो की हे नवीन फीचर WhatsApp ला जोडलं जाणार का तर अशाच आणखी एका सेवेवर काम सुरू आहे, ज्याद्वारे युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉलरचं नाव पाहायला मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक लोक फसवणुकीच्या कॉलला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत ट्राय अशा फीचरवर काम करत आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांना कोण कॉल करतंय याची माहिती कळेल मात्र, व्हॉट्सअ‍ॅपवर ही सेवा कशी असेल याबाबत फारशी माहिती नाही.

एकूणच, ही सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सना एक चांगला कॉलिंग अनुभव मिळेल हे नक्की…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!