NITIN GADAKARI : 15 वर्षे उलटून गेलेल्या नऊ लाख जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार ! एक एप्रिल पासून…

629 0

महाराष्ट्र : केंद्र आणि राज्य सरकारच्या आखत्यारितील 15 वर्षापेक्षा जास्त जुन्या गाड्या रस्त्यावरून हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याच पार्श्वभूमीवर नऊ लाख गाड्या एक एप्रिल पासून हद्दपार होणार आहेत. या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना माहिती दिली आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या गाड्यांबरोबरच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या मालकीच्या पंधरा वर्षापेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार आहेत.

तसेच इथेनॉल, मिथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!