NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

454 0

पुणे : चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडकले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील याची दखल घेतली आहे.

आज पुणे दौऱ्यावर असलेल्या मंत्री गडकरींनी चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार असल्याचे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. गडकरींनी पुण्यातील वाहतूकचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येतील असंही ते म्हणाले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू आहे. असं गडकरी म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!