मुंबई- शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी आपण सुरत कशी सुटका करून घेतली, कसाबसा जीव वाचवून परत आलो, याची रंजक कहाणी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये कथन केली. त्यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर खळबळजनक आरोप केला होता. मात्र त्यांचा हा दावा सपशेल खोटा ठरला. कारण शिंदे यांची पत्रकार परिषद संपण्याच्या आत समोर आलेल्या फोटोमुळे देशमुख यांचा बनाव उघड पडला. या फोटोबद्दल पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत काढता पाय घेतला.
देशमुख यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाने काही फोटो व्हायरल केले. यामध्ये नितीन देशमुख हसतमुखाने चार्डर्ड प्लेनपाशी उभे असलेले दिसत आहेत. विमानामध्ये बसल्याचे देखील दिसून येत आहेत. हे फोटो शेअर करून देशमुखांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. देशमुखांची परत जायची इच्छा होती म्हणून त्यांना चार्टर्ड प्लेनने सुखरूप मुंबईत सोडण्यात आलं, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
आज हे फोटो व्हायरल झाल्यानंतर देशमुखांना पत्रकारांनी त्याबद्दल विचारले असता आग्र्याहून सुटका करून घेतली, असं उडवाउडवीची उत्तर देत ते पोलिसांच्या गराड्यात निघून गेले.
नितीन देशमुख काय म्हणाले होते ?
मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो, पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. असे देशमुख म्हणाले होते.