NIRMALA SITARAMAN : “भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, पण काहींना हे पचणी पडत नाही…” निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल

331 0

नवी दिल्ली : आज लोकसभेत बोलत असताना विरोधकांच्या टीकेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खेद व्यक्त केला आहे. लोकसभेत बोलताना त्या म्हणाल्या की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. परंतु विरोधकांना ते पचनी पडत नाही. संसदेत असे काही लोक आहेत जे देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळतात. भारतीय रुपया जगातील प्रत्येक चलनापेक्षा मजबूत आहे. डॉलर आणि रुपया मधील तफावत वाढू नये यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहेत.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था आयसीयू मध्ये होती. परकीय चलन साठा खूपच कमी झाला होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतरही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पण काहीना पचनी पडत नाही. ते देशाची बदनामी करण्यात व्यस्त आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे असा थेट हल्लाबोल देशाच्या आर्थिक प्रगतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!