निलेश माझिरेचें नक्की झाले ! आज सायंकाळी होणार पक्षप्रवेश कार्यक्रम, ‘या’ पक्षात करणार प्रवेश

312 0

मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विशेष करून निलेश माझिरे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असतानाच आज सायंकाळी निलेश माझिरे यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर आज हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.

दरम्यान पुण्यामध्ये मनसेच्या गोटात अनेक दिवसापासून अंतर्गत राजकारणाला ऊत आला आहे. त्यानंतर मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरून निलेश माझिरे यांना कमी करण्यात आले. यानंतर निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!