निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले; पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

435 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून निलेश माझेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्री निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करण्यात येत आहे. सर्व संबंधितांनी कृपया याची नोंद घ्यावी.

अचानक निलेश माझीरे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अंतर्गत राजकारणाचा फटका माझिरे यांना बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!