निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश VIDEO

479 0

मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विशेष करून निलेश माझिरे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असतानाच गुरुवारी निलेश माझिरे यांचा शिंदे गटामध्ये अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश झाला आहे.

दरम्यान पुण्यामध्ये मनसेच्या गोटात अनेक दिवसापासून अंतर्गत राजकारणाला ऊत आला आहे. त्यानंतर मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरून निलेश माझिरे यांना कमी करण्यात आले. यानंतर निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता.निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!