NIA ची पुण्यात ‘या’ भागात कारवाई ; PIF च्या कार्यालयावर छापा ; CRPF दाखल पहा VIDEO

456 0

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. एनआयए आणि ईडीने या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हास्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेऊन आतापर्यंत १०० जणांना अटक केली आहे.

एनआयएने केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणे , प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी कट्टर बनवणे अशा कारवायांमध्ये जे व्यक्ती सामील आहेत त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर देखील तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येतो आहे.

देशात एनआयए आणि ईडीन आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालय यांनी केरळ तमिळनाडू कर्नाटक सह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे मारले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुण्यासह, नवी मुंबईमध्ये देखील छापे मारून 20 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यातील कोंढवा या भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून पीएफआय संघटनेच्या दोन सदस्यांना अटक केली. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. यामध्ये कायम शेख आणि राजी अहमद खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .

पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहाटेपासूनच कारवाई सुरू केली. टेरर फंडिंग तसेच संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग याविषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंडव्यामध्ये असणाऱ्या पीएफआयच्या कार्यालयावर आज पहाटे छापा टाकण्यात आला. अचानक झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने सीआरपीएफची तुकडी देखील दाखल करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!