#NEWS DELHI : आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या नव्या महापौर

561 0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर बुधवारी दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. ‘आप’च्या उमेदवार शैली ओबेरॉय यांना एकूण १५० मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली.

आम आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय या दिल्लीतील पटेल नगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८६ च्या नगरसेविका आहेत. 86 वर्षीय शैली ओबेरॉय पेशे से प्रोफेसर हैं। त्यांनी पीएचडीपर्यंत चे शिक्षण घेतले आहे. २०१३ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. 39 पर्यंत शैली ओबेरॉय आम आदमी पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या उमेदवाराचा २६९ मतांनी पराभव करत पहिल्यांदाच नगरसेविका बनल्या.

पटेल नगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८६ मधून शैली यांनी भाजपच्या दीपाली कपूर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे ज्या प्रभागातून त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरसेवकपदाची निवडणूक लढवली, तो प्रभाग भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा बालेकिल्ला मानला जातो. शैलीने आता भाजपच्या उमेदवार रेखा गुप्ता यांचा पराभव करत दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!