CORONA UPDATES : कर्नाटकमध्ये नववर्षाची सुरुवात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीने

294 0

कर्नाटक : सध्या जगभराला पुन्हा एकदा कोरोनाने धोक्याची घंटी दिली आहे. जपान, चायना, ब्राझीलमध्ये कोरोनान थैमान घातल असतानाच भारत सरकारने देखील प्रत्येक राज्याला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नवीन वर्ष आणि क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केल्याची घोषणा कर्नाटकचे आरोग्यमंत्री यांनी सांगितला आहे.

सोमवारी कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली असून, खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाबरून जाऊ नका, कोरोनाच्या नियमांचे पालन करा असं कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटल आहे.

कर्नाटकमध्ये सिनेमागृह शाळा आणि कॉलेजेसमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच नववर्षासाठी हॉटेल, बार आणि पर्यटन स्थळावर गर्दी होणार, याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!