जन्मदात्याची भीषणता : बाळ रडलेले शेजाऱ्यांना कळू नये म्हणून पोटच्या मुलीच्या बाळाचा केला असा निर्दयीपणे अंत

854 0

सातारा : साताऱ्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी खोऱ्यातून एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका पित्याने आपल्या मुलीच्या पोटच्या बाळाचा गळा चिरून शीर धडा वेगळ करून निर्दयपणे हत्या केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील या गावांमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली होती. या मुलीने घरातच बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाने रडायला सुरुवात केली, तसं या पिडीतेच्या वडिलांनी बाळाचं रडणं शेजारच्यांना ऐकू जाऊ नये यासाठी बाळाचा गळा चिरून त्याचे शीर धडा वेगळे केले आणि बाळाची हत्या केली आहे.

या मुलीला पॉक्सो गुन्ह्याच्या तपासामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता मुलीच्या पोटातील गर्भ दिसून न आल्यामुळे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून मुलीने ही धक्कादायक घटना सांगितली आहे. त्यानंतर या निर्दयी पित्याला ताब्यात घेण्यात आल आहे.

न्यायालयाने पीडितेच्या वडिलांना पोलीस कोठडी सुनावली असून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला देखील पॉक्सोच्या गुन्ह्या अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!