विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

491 0

विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते. पॅनकार्ड हे सरकारी कागदपत्रे असून त्याची गरज अनेक कामासाठी लागू शकते. हे एक अत्यावश्यक दस्तावेज आहे. याशिवाय आपण प्राप्तीकर विवरण भरू शकत नाही. पॅनकार्डमध्ये आडनावात बदल करायचा असेल तर त्याची प्रक्रिया खुपच सुलभ आहे.

पॅनकार्डमध्ये असे बदला आडनाव

https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर क्लिक करा.

यानंतर आपल्याला अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल.
या अर्जात आपल्याला महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
हा अर्ज ऑनलाइन सबमीट करावा लागेल.
नावाशी निगडीत बदल करण्यासाठी कॉलम निवडा आणि अर्जात आपल्या पॅनचा समावेश करा.
यानंतर अर्जात भरलेली माहिती व्हेरिफाय करावी लागेल.
व्हेरिफिकेशननंतर आपल्याला व्हॅलिडीटीवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर आपल्याला सबमीटवर क्लिक करावे लागेल.
पत्ता बदलण्यासाठी शुल्क
आडनाव बदलण्यासाठी आपल्याला अर्ज दाखल करावा लागेल. यासाठी पेमेंट करणे गरजेचे आहे. हे पेमेंट आपण नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कॅश कार्डच्या माध्यमातून करू शकता. आपल्याला भारतातच पत्ता बदल करायचा असेल तर 110 रुपये जमा करावे लागतील. भारताबाहेर पत्त्यासाठी 1020 रुपये भरावे लागतील.
हार्ड कॉपी जमा करावी लागेल
पेमेंट झाल्यानंतर आपल्याला ‘पॅन अप्लिकेशन’ डाऊनलोड करून तो भरावा लागेल. आता प्रिंटआऊटच्या माध्यमातून हार्डकॉपी काढून घ्या. अर्जावर आपले दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लावा. या अर्जावर सही करा. त्याचवेळी काही कागपदत्रे देखील सेल्फ अटेस्टेड करून जमा करावे लागतील. याशिवाय ‘एनएसडीएल’वर अर्ज भरला असेल तर तो अर्ज पोस्टामार्फत ‘एनएसडीएल’ला पाठवावा लागेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!