पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

519 0

पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा छात्र 7 फेब्रुवारी रोजी एनडीएमध्ये दाखल झाला होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश प्रबोधिनी प्रशासनाने दिले आहेत.

जी प्रत्युष असे मृत्यू झालेल्या छात्राचे नाव असून तो मूळचा बंगळुरुचा आहे. प्रत्युष हा 147 व्या तुकडीचा विद्यार्थी होता. 7 फेब्रुवारी रोजी एनडीएमध्ये दाखल झाला होता. दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 5 च्या सुमारास त्याच्या होस्टेलच्या खोलीसमोर तो बेशुद्धावस्थेत आढळला. प्रयत्न करूनही शुद्धीवर न आल्याने त्याला प्रबोधिनीच्या लष्कर रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीचा त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एनडीएकडून दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून या घटनेचा अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आलेला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!