ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का

272 0

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे ही ग्रामपंचायत 11 सदस्यांची आहे. तरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या आहेत. किवत ही नव्याने तयार करण्यात आलेली ग्रामपंचायत आहे.

येथील सात जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. रविवारी हे मतदान पार पडले. किवत ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याच दिसून आले.

आवळे यांना आपल्याच गावात पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव आवळे यांचे भालावडे हे गाव आहे. या आधी भुलावडे या ग्रामपंचायतीवर आवळे गटाचे वर्चस्व होते. मात्र या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे सरपंच निवडीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

Share This News
error: Content is protected !!