राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे – शरद पवार

207 0

शिर्डी : तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नेते शरद पवार म्हणाले.

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. तेव्हा ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू आहे. यावेळी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.

शिर्डीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा एकदा मुंबईत परतणार असून ते ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होणार आहेत. त्यांच्यावर अजून दोन चार दिवस उपचार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Share This News
error: Content is protected !!