खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; गुन्हा दाखल करण्याची मागणी

283 0

नागपूर : बाळासाहेबांची शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे देत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन खरंतर त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाचे खंडन केले होते. त्यात त्यांना बदनाम करण्याचा संबंधित महिलेचा हेतु असल्याचे म्हंटले होते. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांनी संबंधित महिलेवर अन्याय केला आहे. त्यामध्ये माझ्याकडे सगळे पुरावे असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करावी अन्यथा मला पुरावे जाहीर करावे लागतील असा इशारा रूपाली पाटील यांनी दिला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!