Breaking News ! छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद, IED स्फोट घडवला

1852 0

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १ जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये १० DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. 

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. याच रस्त्यावरून छत्तीसगडच्या पोलिसांचे वाहन जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. या मध्ये छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे ११ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांशी सामना करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या स्थानिकांचा या पथकामध्ये समावेश होता. गुप्ततर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी मोहीमेवरून हे सर्व पोलीस परत येत असताना ही घटना घडली.

याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. नक्षलवाद्यांना सोडणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!